ह्या पहिल्या पोस्टचा विषय कोणता असावा बरं? खूप विचार केला. डोक्यात हजार विचार आणि कल्पनांची गर्दी जमलीय. त्यामुळे नक्की सुरवात कुठून करावी तेच समजत नाही. मला ह्या ब्लोग मधून काय साधायचं आहे त्याबद्दलच थोडंसं लिहिते. बरेच लोक मला विचारतात कि मी हे क्षेत्र का निवडलं? हे क्षेत्र म्हणजे विशेष गरजा असलेल्या मुलांना शिकवण्याच . विशेष गरजा असलेली मुलं म्हणजे नक्की कोणती मुलं? असाही प्रश्न बऱ्याचदा पडतो. मी autism असलेल्या मुलांना शिकवते. मग autism म्हणजे नक्की काय? तर हे सगळे विषय मी इथे हाताळणार आहे. ह्याच बरोबर माझ्या स्वतः चा इथवरचा प्रवास, माझे अनुभव मी इथे मांडणार आहे. Autism ला मराठी/हिंदीत 'स्वलीनता' किंवा 'स्वमग्नता' हे शब्द वापरलेले मी ऐकलेत. मी स्वमग्नता हा शब्द इथे वापरेन कारण हा शब्द ऐकता/वाचताच थोडीशी कल्पना येईल. मला इथे बरचसं लिखाण मराठीतून करायचं कारण स्वमाग्नातेवर खूपच कमी माहिती आज मराठीत उपलब्ध आहे. इंग्रजीत ह्या विषयावर प्रचंड माहिती सहजपणे अपलब्ध आहे आणि रोज नव- नवीन माहिती प्रकाशनांत येतच असते. मराठीत आणि इतर भारतीय भाषांमध्ये अगदी जुजबी माहिती असल्यामुळे आणि हा प्रकार थोडासा नवीन असल्यामुळे आपल्याकडे स्वम्ग्नेते बद्दल कमीच जागरूकता आणि झालाच तर गैरसमज खूप आहेत. तसा हा प्रकार समजायलाही खूप क्लिष्ट असल्यामुळे बऱ्याचदा त्याची तुलना न सुटणाऱ्या कोड्याशी (mysterious puzzle) केली जाते. मी काही ह्या विषयावरची तज्ञ नाहीये. माझ्या आजवरच्या अनुभावरून मला जे काही शिकता आलं ते मुलं आणि त्यांचे पालक ह्यांच्या मुळे. मला ह्या क्षेत्रात काही खूपच अनुभवी आणि तज्ञ मंडळींसोबत काम करायची संधी लाभली त्यामुळे मी अजून शिकत गेले. ते सगळे अनुभव मला इथे मांडायला आवडतील. अधून मधून माझ्या खाजगी आयुष्यावर पण सर्वसाधारण सर्वांना जवळचे वाटणारे काही विषयहि मी इथे मांडेन.
चला ठरला तर मग! काहीतरी ध्येय नक्की झालंय. आता पाहू हा प्रवास कसली वळणं घेतो ते. आज इथेच थांबते...पुढला पोस्ट माझ्या ह्या प्रवासाची सुरवात कशी झाली त्याबद्दल असेल. पुन्हा भेटू....लवकरच!
aare wah...khupach chaan...donhi bhashanvar tuzz changal prabhutva aahe.....aamhi uchuk aahot....tuzya navin block sathi....
ReplyDeleteMarathi aani Engraji , donhi bhashanmadhey vichaar karoon sahaztene te maandnyachya hya tuzhya prayatnanche sarvaat aadhi kautuk. pahilya paanaat shabd aani bhavana khup chaan maandales . pudhchya pravasala manapasun shubhechya
ReplyDelete