Monday, 11 July 2011

'पहिलं पान'

पहिला-वाहिला ब्लोग पोस्ट लिहिताना खूप उत्साह वाटतोय. माझ्या घरातून कॉम्पुटर द्वारे मी अख्या जगाशी संवाद साधू शकतेय ह्यातच खूप आनंद आहे. मला ब्लोग वर नियमित पणे लिहायला खूपच आवडेल. तसा मी प्रयत्न पण करेन. पण ५ महिन्याच्या माझ्या गोंडस बाळाला माझा पूर्ण वेळ पाहिजे त्यामुळे हे शक्य होईलच असे नाही. 
  ह्या पहिल्या पोस्टचा विषय कोणता असावा बरं?  खूप विचार केला. डोक्यात हजार विचार आणि कल्पनांची गर्दी जमलीय. त्यामुळे नक्की सुरवात कुठून करावी तेच समजत नाही.  मला ह्या ब्लोग मधून काय साधायचं आहे त्याबद्दलच थोडंसं लिहिते. बरेच लोक मला विचारतात कि मी हे क्षेत्र का निवडलं? हे क्षेत्र म्हणजे विशेष गरजा असलेल्या मुलांना शिकवण्याच . विशेष गरजा असलेली मुलं म्हणजे नक्की कोणती मुलं? असाही प्रश्न बऱ्याचदा पडतो. मी autism असलेल्या मुलांना शिकवते. मग autism म्हणजे नक्की काय? तर हे सगळे विषय मी इथे हाताळणार आहे. ह्याच बरोबर माझ्या स्वतः चा इथवरचा प्रवास, माझे अनुभव मी इथे मांडणार आहे. Autism ला मराठी/हिंदीत 'स्वलीनता' किंवा 'स्वमग्नता' हे शब्द वापरलेले मी ऐकलेत. मी स्वमग्नता हा शब्द इथे वापरेन कारण हा शब्द ऐकता/वाचताच थोडीशी कल्पना येईल. मला इथे बरचसं लिखाण मराठीतून करायचं कारण स्वमाग्नातेवर खूपच कमी माहिती आज मराठीत उपलब्ध आहे. इंग्रजीत ह्या विषयावर प्रचंड माहिती सहजपणे अपलब्ध आहे आणि रोज नव- नवीन माहिती प्रकाशनांत येतच असते. मराठीत आणि इतर भारतीय भाषांमध्ये अगदी जुजबी माहिती असल्यामुळे आणि हा प्रकार थोडासा नवीन असल्यामुळे आपल्याकडे स्वम्ग्नेते बद्दल कमीच जागरूकता आणि झालाच तर गैरसमज खूप आहेत. तसा हा प्रकार समजायलाही खूप क्लिष्ट असल्यामुळे बऱ्याचदा त्याची तुलना न सुटणाऱ्या कोड्याशी (mysterious puzzle) केली जाते. मी काही ह्या विषयावरची तज्ञ नाहीये. माझ्या आजवरच्या अनुभावरून मला जे काही शिकता आलं ते मुलं आणि त्यांचे पालक ह्यांच्या मुळे. मला ह्या क्षेत्रात काही खूपच अनुभवी आणि तज्ञ मंडळींसोबत काम करायची संधी लाभली त्यामुळे मी अजून शिकत गेले. ते सगळे अनुभव मला इथे मांडायला आवडतील. अधून मधून माझ्या खाजगी आयुष्यावर पण सर्वसाधारण सर्वांना जवळचे वाटणारे काही विषयहि मी इथे मांडेन.

चला ठरला तर मग! काहीतरी ध्येय नक्की झालंय. आता पाहू हा प्रवास कसली वळणं घेतो ते. आज इथेच थांबते...पुढला पोस्ट माझ्या ह्या प्रवासाची सुरवात कशी झाली त्याबद्दल असेल. पुन्हा भेटू....लवकरच! 

Saturday, 9 July 2011

first post

I am feeling very excited as I type my first ever blog-post. It feels great to have this tool at my finger tips that has this amazing power of meeting the world literally from my laptop. I do hope to update my blog regularly but would like to mention at the outset that might not always be possible as I have 5 month old gorgeous little son who needs my constant attention. 
I have been thinking about the topic for this first ever post. Well, I have millions of thoughts and ideas floating in my head about how my blog will take shape. It’s hard to decide where to start. Let me just start with explaining what I hope to achieve here. I would like to narrate my journey as a special needs teacher. Many people have asked me why I chose this field and I have some strong influences that lead me to this profession. So, naturally that would be the starting point of my journey. Secondly, I don't want this sharing to be completely personal in nature. I would rather have major focus on sharing information on autism and spreading awareness about this condition. To do this I would have to get skilled in writing in my mother tongue Marathi. There is enormous amount of information available on autism in English and there is almost negligible source of information in Indian languages. I am not an expert on the topic of autism however would like to share what I know and I’m very sure that I will meet people here who know something I don’t.

So I have a plan then! I do hope people will enjoy reading my blog. I hope to create a balance of sharing personal and professional information. I would love to receive feedback about the content and constructive criticism. I want to say one thing about my writing skill (something I discovered while doing masters) that I am too precise and have great difficulty expanding on an idea. If my friends, who know this weakness in me, are reading this post they will be laughing their heads off remembering the times I have complained ‘My essay is ready BUT I’m 100 words short of the 3000 words limit’. I am glad there is no one ‘evaluating’ my posts and there are no limits and conditions.

On that note I’m signing off for today. Hope to be here soon!